Friday, April 25, 2025
Homeनाशिकमुंबई-आग्रा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; 13 मेंढ्यांचा मृत्यू, प्रवासी जखमी

मुंबई-आग्रा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; 13 मेंढ्यांचा मृत्यू, प्रवासी जखमी

दहिवड |मनोज वैद्य| Dahiwad

मुंबई-आग्रा महामार्गावरती (Mumbai-Agra Highway) राहुड घटाच्या पायथ्या जवळ आज 16 डिसेंबर रोजी 4 वाजेच्या दरम्यान चार वाहनांचा भिषण आपघात (Accident) झाला. यात 2 बसचा समावेश तर एक विटाने भरलेला ट्रक व कांद्याचा ट्रक या वाहनांचा समावेश आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवाशी जखमी (Injured) झाले आहे. तर रस्ता ओलांडणार्‍या 13 मेंढ्या (Sheep) चिरडल्या गेल्या आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज दिनांक 16 डिसेंबर रोजी 4 वाजेच्या दरम्यान राहुड घाटाच्या पायथ्याशी भिषण अपघात झाला. त्यात ठाणे डेपोची बस (ST Bus) क्रमांक एम एच 20 बीएल 3727 अतीवेग असल्यामुळे चालकाचे वाहनांवरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओंलडणार्‍या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली.

- Advertisement -

यावेळी हि बस प्रवाश्यांनी भरलेली होती. त्याच वेळेत प्रवाश्यांची सोय म्हणुन येणारी बस क्रमांक एमएच 14 के क्यु 0657 हि थांबवली. प्रवाशी बसमध्ये चढत असतांना अचानक मागुन कांद्याचा ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने ह्या बसला मागुन धडक दिल्याने पुढे ट्रक क्रमांक एमएच 15 इजि 5967 ह्या विटाने भरलेल्या ट्रकला धडक (Hit) दिल्याने ट्रक पलटी झाला. स्थानिक नागरीकांनी जखमी प्रवाशांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी रूग्णालयात पाठवले. घटनास्थळी देवळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पीएसआय कैलास गुजर, दामोधर काळे, चांदवडचे पोलीस निरीक्षक वाघ यांनी हजर होत वाहतूक सुरळीत केली व जखमींना उपचारासाठी पाठविले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...