Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये प्रवाशांची चेंगराचेंगरी! नऊ जण जखमी, थरारक VIDEO व्हायरल

मुंबईच्या वांद्रे टर्मिनसमध्ये प्रवाशांची चेंगराचेंगरी! नऊ जण जखमी, थरारक VIDEO व्हायरल

मुंबई । Mumbai

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या (Mumbai News) प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ९ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतील जखमी प्रवाशांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार, चेंगराचेंगरीची ही घटना वांद्रे टर्मिनसवर घडली. सकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. वांद्रे टर्मिसवरून पहाटे गोरखपूरला जाणारी रेल्वे लागते. ही रेल्वे पूर्णपणे अनारक्षित असते. म्हणूनच या रेल्वेला मोठ्या प्रमाणात प्रवाशी गर्दी करतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशला जाणारे प्रवासी या रेल्वेतून प्रवास करतात.

घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे

शबीर अब्दुल रेहमान
परमेश्वर गुप्ता
रविंद्र छुमा
रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती
संजय कांगाय
दिव्यांशू यादव
मोहम्मद शेख
इंद्रजित शहानी
नूर शेख

दिवाळी आणि छट पूजा हे सण उत्तरेतील राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. हे सण कुटुंबासोबत साजरे करावेत म्हणून मुंबईत कामाला आलेले उत्तर भारतीय या सणानिमित्त आपापल्या गावी जातात. गोरखपूरला जाणाऱ्या या रेल्वेतून प्रवास करण्यासाठी असेच प्रवासी वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर गेले होते. मात्र ही रेल्वे उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...