Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र'बेस्ट'चा ब्रेक फेल; रिक्षाला फरफटवलं, टेम्पोलाही ठोकलं, अन्...

‘बेस्ट’चा ब्रेक फेल; रिक्षाला फरफटवलं, टेम्पोलाही ठोकलं, अन्…

मुंबई | Mumbai

सध्या पवासाने (Monsoon) सर्वत्र चांगलाच कहर केला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात अपघाताचे (Motorcycle Accident Video) प्रमाण देखील वाढते.

- Advertisement -

पावसाळ्यात रस्ते अपघाताच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही घटना ह्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या असतात. सध्या एका अपघाताचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ‘काळ आला होता पण, वेळ नाही’ या म्हणीचा प्रत्यय येतो.

या अपघातामध्ये बेस्ट बसने (Best Bus Accident) रिक्षाला अक्षरशः फरफटत नेलं. टेम्पोलाही धडक दिली. मात्र काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघातामध्ये, ज्या रिक्षाला बेस्ट बसने चिरडलं, त्या रिक्षाचा चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही (Mumbai Accident CCTV Video) कैद झाला.

या बसमध्ये प्रवासी होते; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप असले तरी चालक व कंटक्टर या दोघांसह एक प्रवासी व रिक्षा चालक भुवाळ पांडे जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमींची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या