Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजक्रिकेटविश्वात शोककळा! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

क्रिकेटविश्वात शोककळा! मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

मुंबई । Mumbai

- Advertisement -

भारतीय क्रिकेट (Indian Cricket) विश्वात शोककळा पसरली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (Mumbai Cricket Association) अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचे निधन झाले आहे.

अमेरिकेत अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या झटकाने (cardiac arrest) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अमोल काळे याचं निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या टी ट्वेन्टी विश्वचषक क्रिकेट करंडकाचे सामने पाहण्यासाठी ते अमेरिकेतील (USA) न्यूयॉर्क (Nassau County International Cricket Stadiums, New York) शहरात मित्रांसमवेत गेले होते.

रविवारी पार पडलेल्या भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याचा त्यांनी आनंद घेतला. त्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. काही क्षणांत त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

अमोल काळे हे मूळचे नागपूरचे होते. अमोल काळे यांचा मुख्य व्यवसाय ईलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर. त्याचबरोबर त्यांचे इतरही व्यवसाय आहेत. अमोल काळे यांचे आई वडील हे पेशाने शिक्षक होते. ते नागपुरातील नूतन भारत विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत होते. अमोल काळे यांच्या परिवाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी सुद्धा जवळचा संबंध आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळे यांनी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. या निवडणूकीत काळे यांनी माजी क्रिकेटर संदीप पाटील यांचा पराभव केला. अध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केल्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले होते. काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या