Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला हादरवणाऱ्या 'त्या' प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या ‘त्या’ प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्याप्रकरणातील (Sakinaka rape-murder case) आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे…

- Advertisement -

मोहन चौहान (MOhan Chohan) असे आरोपीचे नाव असून दिंडोशी सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एका महिलेवर बलात्कार (Rape) करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला होता. घटनेनंतर संबंधित महिलेचा मृतदेह एका टेम्पोमध्ये आढळून आला होता.

तसेच या प्रकरणाचे सीसीटिव्ही (CCTV) फुटेजदेखील समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी (police) या प्रकरणाचा तपास जलदगतीने करत आरोपीविरोधात सर्व पुरावे गोळा केले. तसेच न्यायालयात सादर केलेल्या पुरावाच्या आधारे दिंडोशी सत्र न्यायालयाने (Dindoshi Sessions Court) हा निकाल दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या