Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांच्या चुकांवर ठेवले बोट; सरकारवर ही ओढले ताशेरे

मुंबई उच्च न्यायालयाने पोलीसांच्या चुकांवर ठेवले बोट; सरकारवर ही ओढले ताशेरे

मुंबई | Mumbai
बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन केल्यानंतर सरकारी पातळीवर हालचाली झाल्या आणि तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने स्युमोटो याचिका दाखल करुन घेतली. यावेळी न्यायालयाने बदलापूर पोलिसांनी तपासात केलेल्या अक्षम्य चुकांवर बोट ठेवत परखड शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

हाय कोर्टात न्यायमुर्ती भारती डांगरे आणि न्यायमुर्ती मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी बदलापूर पोलिसांनी तपासात केलेल्या चुकांवर न्यायालयाने बोट ठेवले. पोलिसांनी जबाब इतक्या उशिरा का नोंदवला अशी विचारणा न्यायालयाने केली. ड्युटी ऑफिसरवर न्यायालयाने ताशेरे ओढले. हे असे व्हायला नको होते. घटना १३ तारखेला घडली, एफआयआर १६ तारखेला आणि जबाब २१ तारखेला घेतला जातो हे अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले. आम्ही कुणाच्या विरोधात नाही पण लोंकाना न्याय मिळाला पाहीजे हे आमचे म्हणणे आहे. आम्ही याची लिखित नोंद घेत नाहीए. पण तुम्ही मात्र गंभीर नोंद घ्या यापुढे असे होता कामा नये असे न्यायालयाने स्पष्ट बजावले.

- Advertisement -

सरकारवर ओढले ताशेरे
या सुनावणी वेळी हायकोर्टाने राज्य सरकारला देखील फटकारले असून लोकांनी रस्त्यावर उतरल्यानंतर एसआयटी स्थापन होते हे खेदजनक आहे, अशा शब्दांत हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. तसेच तपास विशेष पथकाकडे देण्याच्या आधी बदलापूर पोलिसांनी काय केले? त्याची कागदपत्रे कुठे आहेत? पीडित मुलींचे समुपदेशन केले का? असे विविध प्रश्न हायकोर्टाकडून राज्य सरकारच्या वकिलांना विचारण्यात आले.

राज्य सरकारच्या वकिलांनी बदलापूर प्रकरणातील तपासाबाबत कोर्टात माहिती दिली की, “या प्रकरणात पहिल्या पीडीत मुलीचे समुपदेशन झाले करण्यात आले असून दुसऱ्या पीडितेचे समुपदेनाची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी झाल्यानंतर पालक १६ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात आले. याप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी एसआयटी स्थापन झाली असून तपासाला विलंब करणाऱ्या संबंधित पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले. अत्याच्याराची घटना दाबल्याप्रकरणी शाळेवर देखील कारवाई करणार आहोत,” अशी माहिती महाअधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी न्यायालयात दिली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या