Monday, July 22, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी कोर्टाची स्युमोटो याचिका; आज तातडीची सुनावणी

राज्यातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी कोर्टाची स्युमोटो याचिका; आज तातडीची सुनावणी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यातील सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी हायकोर्टात स्युओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आजच तातडीची सुनावणी होणार आहे. कोर्टाने या घटनेची स्वतःहून गंभीर दखल घेतली असून स्युमोटो याचिका दाखल केली आहे.

नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नागपूर या शहरांमध्ये गेल्या ४८ तासांत नवजात बालकांसह अनेकांचा मृत्यू झाला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, अशा गोष्टीमुळे मृत्यू होत असतील तर अजिबात खपवून घेतले जाऊ शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांत राज्यातील सरकारी रुग्णालयात ४१ जणांचा मृत्यू झाला. आज (बुधवार) कोर्टात सुनावणी लावण्यात आली असून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यावर नेमकी घटना काय आणि कशी घडली, या साऱ्याची माहिती घेतो आणि प्राथमिक म्हणणे मांडतो, असे महाधिवक्ता डॉ. विरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितले.

त्यावर विष्णूपुरीच्या रुग्णालयात किती तज्ज्ञ डॉक्टर आहेत यासह अन्य प्राथमिक माहितीही आम्हाला उद्या द्या, असे तोंडी निर्देश खंडपीठाने महाधिवक्ता सराफ यांना दिले आहेत. तसेच शुक्रवारी याप्रश्नी प्राधान्याने सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.

दरम्यान, नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अवघ्या ३६ तासांत झालेल्या ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारने चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली असून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात दोन अर्भकांसह १० जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल सुरू झाला. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या