Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Local Fight: केस ओढले, चापटा मारल्या, धक्काबुक्की; लोकलमध्ये महिलांत रक्तबंबाळ होईपर्यंत...

Mumbai Local Fight: केस ओढले, चापटा मारल्या, धक्काबुक्की; लोकलमध्ये महिलांत रक्तबंबाळ होईपर्यंत तुफान हाणामारी, Video Viral

मुंबई | Mumbai
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला डब्यात झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट तुंबळ हाणामारीत झाले. एकमेकींवर तोंडाने शिवीगाळ करत करत, दोघींनी एकमेकींना जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून एक महिला रक्तबंबाळ झाली आहे.

मुंबईतील लोकल रेल्वेच्या महिलांच्या डब्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिला एकमेकींवर तुंबळ हाणामारी करताना दिसत आहे. या हाणामारीत एका महिलेचे डोक फुटलं असल्याचे व्हिडीओत दिसून आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून लोकलची ओळख आहे. सकाळ संध्याकाळ रात्री लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी असते. अनेक महिला ऑफिस, कामधंदा, कॉलेजसाठी प्रवास करत असतात. या गर्दीत जागा मिळवण्यासाठी किंवा एका चुकीच्या स्पर्शामुळे वाद होणे नवीन नाही. मात्र, यावेळी मुंबई लोकलच्या महिला डब्यात सुरू झालेला वाद इतका वाढला की थेट हातघाईवर आली. एकमेकींचे केस ओढणे, चापटा बुक्के आणि अंगावर पडून मारहाण सगळे काही त्या काही मिनिटांत घडले.

YouTube video player

व्हिडीओमध्ये काही महिलांच्या वादावादीचा आवाज ऐकू येतो. काही क्षणातच महिलांमध्ये जोरदार धक्काबुक्की, मारहाण आणि गोंधळ सुरु झाला. गंभीर बाब म्हणजे ही हाणामारी लोकल ट्रेनच्या दरवाजामध्ये सुरू झाली. काही महिला प्रवाशांनी लोकलचा दरवाजा बंद करून घेतला असल्याचे व्हिडीओत दिसून आले. दोन महिलांमधील ही भांडणे सोडवण्यासाठी काही महिलांनी पुढाकार घेतला. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेरात कैद झाला असून, नेटकऱ्यांनी तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.

वादाचे कारण अस्पष्ट
नेमकी ही घटना पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्ग या तिन्हीपैकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये ही हाणामारी घडली हे समजलेलं नाही शिवाय लोकलमध्ये घडलेल्या या भांडणामागचे नेमके कारण काय होते याची माहितीही अद्याप मिळालेली नाही. काही प्रवाशांनी जागा मिळवण्यावरून वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींनी वैयक्तिक वादाचा संशय व्यक्त केला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

टॅरिफ

India-US Tariff: ग्रेट डील! अमेरिकन टॅरिफवरुन भारताला मोठा दिलासा; २५ टक्क्यांवरुन...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ हे धोरण राबवण्यासाठी भारतावर तब्बल 25 टक्के टॅरिफ 1 ऑगस्ट 2025...