Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMumbai Local Train Accident : अपघातातील मृत आणि जखमींची नावे आली समोर;...

Mumbai Local Train Accident : अपघातातील मृत आणि जखमींची नावे आली समोर; पाहा संपूर्ण यादी

मुंबई | Mumbai 

मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा स्थानकाजवळ आज (दि.९ जून) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास
अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील दोन लोकल रेल्वे आजुबाजूच्या रेल्वे ट्रॅकवरुन जात असताना बाहेर लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागून दहा हून अधिक प्रवासी चालत्या ट्रेनमधून (Train Accident) खाली ट्रॅकवर पडले. त्यानंतर आता या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला आणि किती जण जखमी झाले, याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, “आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. यातील जखमींना उपचारासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

YouTube video player

तसेच इतर सात रुग्णांची (पाच पुरुष, दोन महिला) प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी दिली आहे. तर रुग्णालयात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि इतर वरिष्ठ अधिकारी रुग्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

मृत व्यक्तींची नावे

१) केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर)
२) राहुल संतोष गुप्ता
३) विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी)
४) मयूर शाह

जखमींची नावे

१) शिवा गवळी (वय २३) – प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.

२) आदेश भोईर (वय 26, रा. आडगाव,कसारा)- प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

३) रिहान शेख (वय २६, रा.भिवंडी) – प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

४) अनिल मोरे (वय ४०) – प्रकृती चिंताजनक असून, उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.

५) तुषार भगत (वय २२) – प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

६) मनीष सरोज (वय २६, रा.दिवा साबेगाव) – प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

७) मच्छिंद्र गोतारणे (वय ३९, रा. वाशिंद) प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

८) स्नेहा धोंडे (वय २१, रा. टिटवाळा) – प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

९) प्रियंका भाटिया (वय २६, रा.शहाड, कल्याण) – प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

 

ताज्या बातम्या

Crime News : शिक्षिकेची साडेपाच लाखांची ऑनलाईन फसवणूक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar टेलिग्रामवर हॉटेल रेटिंग व ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून खासगी महाविद्यालयातील शिक्षिकेची तब्बल 5 लाख 45 हजार 968...