मुंबई | Mumbai
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वरळी हिट अँड रन प्रकरणात (Hit and Run Case) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला शाहपूर येथून अटक (Arrested) केली आहे. शाह हा अपघात घडल्यानंतर फरार झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता.
हे देखील वाचा : अजित पवार आमदारांसह सिद्धिविनायकाच्या चरणी; फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ
त्यानंतर अखेर पोलिसांनी (Police) त्याला अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहसह १२ जणांना शहापूरमधून (Shahpur) अटक केली आहे.या १२ जणांमध्ये मिहिर शाह याची आई (Mother) आणि बहिणीचा (Sister) देखील समावेश असल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : IMD कडून राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी
दरम्यान, या अपघातापूर्वी (Accideent) मिहीर शाहाने रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन केले होते. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचे आहे, तो चालकाला घेऊन पुन्हा घराबाहेर पडला. प्रवासादरम्यान तो मुंबईतील वरळी भागात पोहोचला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या अपघातानंतर मिहीर शाहने अपघाताच्या स्थळावरून पळ काढला होता. तेव्हापासून तो फरार होता. यानंतर आज त्याला आता अटक करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे म्हणाले, “पाच आमदार…”
नेमकं प्रकरण काय?
रविवारी पहाटे (७ जुलै रोजी) बीएमडब्लू वाहनानं दुचाकीवर जाणाऱ्या एका दाम्पत्याला धडक दिली होती. या धडकेनंतर चालकाने महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ हा अपघात घडला होता. मॉलजवळच असलेल्या वरळी कोळीवाड्यात हे दाम्पत्य राहत असून ते सकाळी ससून डॉकला मासे विकत घेण्यासाठी गेले होते. मासे घेऊन घरी परतत असताना ही घटना घडली होती.
व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा