Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजमुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) माजी कुलगूरू डॉ. स्नेहलता देशमुख (Dr Snehalata Deshmukh) यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वयाच्या 85 वर्षाच्या होत्या. आज (सोमवारी) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरु म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तसंच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले होते. कुलगुरु या पदावर असताना अनेक धडाडीचे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत सक्षम युवा पिढीच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि ‘दुग्धपेढी’ ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहिल यात शंका नाही.

हे देखील वाचा : “समित कदम देवेंद्र फडणवीसांचा खास”; फोटो दाखवत अनिल देशमुख म्हणाले, “त्याला वाय दर्जाची सुरक्षा…”

डॉ. स्नेहलता देशमुख या लहान असल्यापासून हुशार होत्या. देशमुख या रांगोळी, एम्ब्रॉयडरी, ड्रॉईंग-पेन्टिंग गाणी सारख्या अनेक कलांमध्ये पारंगत होत्या. स्नेहलता देशमुख यांचे वडील डॉ. श्रीकृष्ण वासुदेव जोगळेकर हे प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी शस्त्रक्रियेत पदवी मिळवली होती. त्यांनी मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय व के.ई.एम. रुग्णालय येथे अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. स्नेहलता देशमुख या देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे डॉक्टर झाल्या.

हे देखील वाचा : “महाराष्ट्रात मणिपूरसारखी स्थिती…”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

- Advertisment -

ताज्या बातम्या