Tuesday, January 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMunicipal Elections 2026: अन्यथा तुमचे मत बाद होईल! १५ तारखेला मतदान कसे...

Municipal Elections 2026: अन्यथा तुमचे मत बाद होईल! १५ तारखेला मतदान कसे कराल? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नाशिक | Nashik
राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून मतदान आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला सकाळी ७.३० वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार असून सायंकाळी ५.३० वाजे पर्यंत मतदान करता येणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून पक्षांचा प्रचारही थांबणार आहे. यंदाच्या मतदान प्रक्रियेत बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. नागरिकांना एका प्रभागातून ४ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच ४ वेळा बटन दाबावे लागणार आहे. ही मतदान प्रक्रिया कशी असणार आहे? हे जाणून घेऊयात!

मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर निवडणूक अधिकारी तुमची ओळख (मतदार ओळखपत्र किंवा इतर पुरावा) तपासून तुमची नोंद करतील. तुमच्या बोटाला शाई लावली जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी मतदान

- Advertisement -

मतदानासाठी ग्राह्य ओळखपत्रे :

YouTube video player
  • निवडणूक ओळखपत्र (एपिक कार्ड)
  • भारताचा पासपोर्ट
  • आधार ओळखपत्र
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • पॅन कार्ड
  • केंद्र/राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम वा स्थानिक स्वराज्य संस्थेचे फोटो ओळखपत्र
  • राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक
  • फोटोसहित अपंगत्वाचा दाखला
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड
  • निवृत्ती वेतनाशी संबंधित फोटो कागदपत्रे (पासबुक/प्रमाणपत्र)
  • लोकसभा/राज्यसभा किंवा विधानसभा/विधानपरिषद सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र
  • स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो ओळखपत्र
  • श्रम मंत्रालयाचे फोटो असलेले आरोग्य विमा कार्ड

  • असे करा मतदान
  • अ गट : पांढरा रंग (White)
  • ब गट : फिका गुलाबी रंग (Light Pink)
  • क गट : फिका पिवळा रंग (Light Yellow)
  • ड गट : फिका निळा रंग (Light Blue)
    असे चार गट ईव्हीएम मशीनवर देण्यात आले आहेत. त्या गटामध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यापुढे मतदान करण्याचे बटन देण्यात आले आहे. त्या बटनावर क्लिक करुन मतदान करता येणार आहे.

मतदान प्रक्रिया अशी करा
-प्रत्येक जागेसाठी (अ, ब, क, ड) उमेदवारासमोरील बटण दाबा.

  • बटण दाबल्यानंतर त्या जागेसमोरील लाल दिवा (Light) लागेल आणि एक बीप सारखा बझर वाजेल.
  • ‘ड’ जागेचे मतदान झाल्यानंतर लांब ‘बझर’ वाजेपर्यंत थांबा.

चारही जागांसाठी प्रत्येक जागेसाठी एक अशाप्रकारे मतदान केल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन शेवटी ‘बीप’ असा आवाज येईल. बीपचा आवाज आला म्हणजे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, असे समजावे.

तर तुमचे मत अवैध ठरेल
नव्या रचनेनुसार एक प्रभाग म्हणजे चार नगरसेवक. त्यामुळे एका मतदाराला चार उमेदवारांना मतदान करावे लागेल. याचा अर्थ असा की तुम्हाला ईव्हीएमवर चार वेळा बटन दाबावे लागेल. ही चारही मते देणे बंधनकारक आहे. जर तुम्ही चारपैकी एखादे मत दिले नाही, तर तुमचे संपूर्ण मतदान अवैध ठरू शकते.

त्या शिवाय मतदान प्रक्रिया पुर्ण होणार नाही
चारही जागांसाठी मतदान केल्याशिवाय म्हणजेच चारही बटन दाबल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अन्यथा तुमचे मत बाद ठरेल. (उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध आहे.)

ताज्या बातम्या

Nashik MC Election : नाशकात ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले; ‘आप’च्या...

0
नाशिक | Nashik महापालिका निवडणुकीचे मतदान अवघे दोन दिवसांवर येऊन ठेपले असून, महायुतीमध्ये (Mahayuti) एकमेकांना डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. काल (सोमवारी) रात्री नवीन...