Friday, February 6, 2026
Homeनगरपावसाळा तोंडावर; ओढे-नाल्याच्या साफसफाईला मुहूर्त मिळेना

पावसाळा तोंडावर; ओढे-नाल्याच्या साफसफाईला मुहूर्त मिळेना

निविदा प्रक्रिया अडकली आचारसंहितेच्या कचाट्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पावसाळा अवघ्या 10 ते 15 दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही अद्याप शहरातील ओढे व नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू झालेले नाही. महापालिकेने राबवलेली निविदा प्रक्रियाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली आहे. मतदान होऊनही अद्याप आचारसंहिता शिथिल न झाल्याने निविदा मंजुरीला परवानगी मिळण्यासाठी महापालिका जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करणार आहे.

- Advertisement -

दरवर्षी पावसाळ्यात ओढे नाल्यातील गाळ व त्यावरील अतिक्रमणे, वळवलेले व बंदिस्त केलेले प्रवाह यामुळे अनेक भागातील घरात पावसाचे पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. याबाबत महापालिकेने सर्वेक्षणही केलेले आहे. त्यानुसार शहरातील 41 नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण झाल्याचे किंवा त्यावर बंद पाईप टाकून ते बंदिस्त करण्यात आल्याचे, नैसर्गिक प्रवाह वळवण्यात आल्याचे मनपाने सादर केलेल्या अहवालात उघड झालेले आहे. शहरात एकूण 95 किमी लांबीचे ओढे-नाले आहेत. तसेच मनपाच्या पथकाने केलेल्या पाहणीत शहरात 140 ठिकाणी पाणी तुंबत असल्याचे आढळून आले होते. हे प्रवाह मोकळे करण्यासह ओढे व नाल्यातील गाळ काढण्याचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे अपेक्षित आहे.

YouTube video player

महापालिकेने या कामासाठी सुमारे 41.35 लाख रूपये खर्चाची निविदाही काढली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता अद्याप कायम असल्याने ही निविदा मंजूर होऊ शकलेली नाही. अत्यावश्यक बाब म्हणून ही निविदा मंजूर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून परवानगी घेण्यात येणार आहे. त्यानंतर नालेसफाईचे काम सुरू होणार आहे. दरम्यान, पावसाळा 15 दिवसांवर येऊन ठेपल्याने त्यापूर्वी सर्व ओढे नाल्यातील गाळ काढण्याचे व बंदिस्त प्रवाह मोकळे करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

ताज्या बातम्या

महापौरपदी

Nashik News: मोठी बातमी! नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर पदी...

0
नाशिक | प्रतिनिधीनाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी (दि. ६) निवडणूक पार पडली असून, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कुंभनगरीच्या १७ व्या महापौर पदावर भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके...