Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : शनिवारीही उमेदवारी दाखल करता येणार

Ahilyanagar : शनिवारीही उमेदवारी दाखल करता येणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही || निवडणूक आयोगाचा इच्छुक उमेदवारांना दिलासा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआऊट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. तसेच सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या निर्णयामुळे राजकीय पक्ष, उमेदवारी दाखल करणारे इच्छुक आणि समर्थकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasccelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे, त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर उमेदवाराची स्वतःची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बँक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र- 1’ किंवा ‘जोडपत्र- 2’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे दाखल करणे बंधनकारक आहे.

YouTube video player

इच्छुक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल, तोपर्यंत त्यावर इच्छुक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्‍याला विहित मुदतीत म्हणजे 17नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी (ता. 16) ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीना देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यात एक लाखांहून अधिक लाडक्या बहिणींची अडचण?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रियेने नगर जिल्ह्यातही महिलांची डोकेदुखी वाढवली. त्यातच जानेवारी महिन्यात अनेक पात्र...