Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनतारक मेहता फेम 'बबिता'चा अपघात

तारक मेहता फेम ‘बबिता’चा अपघात

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या दीड दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेतील कित्येक पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत.

या मालिकेतील बबिता ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता अतिशय लोकप्रिय आहे. आता मुनमुनचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

तिच्या अपघाताची माहिती मिळताच सोशल मीडियावर नेटकरी आणि चाहत्यांकडून काळजी व्यक्त होत आहे.

काही दिवसांपूर्वी तारक मेहतामध्ये जेठालाल यांचे वडील चंपक चाचाची भूमिका करणाऱ्या अमित भट्ट यांचा देखील अपघात झाला होता. त्यानंतर चाहत्यांनी काळजी व्यक्त केली होती.

आता मुनमुन दत्ताने सोशल मिडीयावर दिलेल्या धक्कादायक बातमीने अनेक चाहत्यांना चिंतेत पाडले आहे.

मुनमुन ही गेल्या काही दिवसांपासून युरोपच्या दौऱ्यावर आहे. त्यात जर्मनीमध्ये असताना तिचा अपघात झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

मुनमुनने इंस्टावरुन एक स्टोरी शेयर केली आहे. तिच्या पायाला दुखापत झाली आहे. तिनं चाहत्यांना काळजी न करु नका. आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. मला दुखापत झाल्यानं दौरा अर्धवट सोडावा लागत असल्याचे मुनमुननं म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या