Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्यापंचवटीत पुन्हा खून; भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या

पंचवटीत पुन्हा खून; भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या

नाशिक | प्रतिनीधी | Nashik

नाशिक शहरात खुनाचे (murder) सत्र सुरूच असून आज (दि. 6) सायंकाळच्या सुमारास पंचवटी (panchavati) परिसरात पुन्हा एका तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार पेठरोड (peth road) परिसरातील शनि मंदिर येथील रहिवासी किरण गुंजाळ (वय २७) याची दिंडोरी रोडवरील (dindori road) अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या (murder) करण्यात आल्याची घटना घडली असुन मयत हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजते.

गुंजाळ हा कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) मिरची विक्रीचा व्यवसाय करत होता. तर पेठ रोडवरील शनी मंदिर, नवनाथ नगर येथील रहिवासी असल्याची समजते. ३ ते ४ जणांनी हल्ला केल्याचे समजते. या हल्लेखोरांच्या मागावर पोलीसांनी (police) जवळपास ५ ते ७ किमी पाठलाग केला असून परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) तपासणीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांनी घेतली गंभीर दखल

पंचवटी परिसरात सायंकाळी भर चौकात झालेल्या खुनाची शहर पोलीस दलाने (City Police Force) गंभीर दाखल घेतली आहे. स्वतः पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत विशेष लक्ष दिले असून गुन्हेगारांच्या शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या