Friday, April 25, 2025
Homeनाशिकजुन्या वादातून तरुणाची हत्या

जुन्या वादातून तरुणाची हत्या

हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी

मनमाड । प्रतिनिधी Manmad

- Advertisement -

येथील माजी नगरसेविकेच्या तरुण मुलाच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या भांडणाची कुरापात काढून टोळक्याने या तरुणाची धारदार हत्याराने वार करीत निर्घृणपणे हत्या केली. शुभम पगारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

या घटनेनंतर फरार झालेल्या सहा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी संतप्त नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. दरम्यान या घटनेत मुख्य हल्लेखोर देखील जखमी झाला असल्याचे समजते.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, 11 वाजेच्या सुमारास शुभम घरी जात असताना शहरातील स्टेडियम परिसरात एका टोळक्या सोबत जुन्या भांडणावरून वाद झाला. त्यानंतर शिवीगाळ आणि हाणामारी करत टोळक्याने धारदार हत्याराने शुभमवर वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

शुभम हा माजी नगरसेविका नूतन पगारे यांचा मुलगा तर सामाजिक कार्यकर्ते पिंटू कटारे यांचा भाचा आहे. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. या घटनेमुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...