धुळे । Dhule
धुळे तालुक्यातील अंबोडे (Ambode) येथे तरूण तर शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यात वाघाडी खुर्द (Waghadi Khurd) येथे महिलेच्या निर्घुण खूनाच्या घटनेने जिल्हा हादला आहे. दोन्हीही घटना आज सकाळी समोर आल्या. याप्रकरणी धुळे तालुका व नरडाणा पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा (crime) नोंदविण्यात आला आहे.
अंबोडे येथे ज्ञानेश्वर रामभाऊ राठोड (वय 23 रा. रणाईचे तांडा ता. अमळनेर जि. जळगाव) या तरूणाचा दि. 1 रोजी सकाळी दहा ते दि. 2 रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान खून (murder) करण्यात आला. अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणावरून तिक्ष्ण हत्याराने त्यांच्या उजव्या जबड्यावर व पोटावर वार करून त्याला गंभीर जखमी करीत त्याचा खून (murder) केला.
घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक अनिल महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तेजाब जोरसिंग राठोड (रा. रणाईचे) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच दुसरर्या घटनेत वाघाडी खुर्द येथे संध्या हेमंत शहा (वय 67 रा. वाघाडी खुर्द) या महिलेचा खून (murder) करण्यात आला. दि. 30 ते रोजी सायंकाळी 6 ते दि. 1 जुन रोजी सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान ही घटना घडली. अज्ञात इसमाने काही तरी कारणावरून तिक्ष्ण हत्याराने महिलेच्या पाठीवर भोसकून गंभीर जखमी करत तिचा निर्घुण खून (murder) केला.
माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि मनोज ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत महिलेचा मुलगा अमोल हेमंत शहा (वय 41 रा. राजजित अपार्टमेंट, शिव कॉलनी, इंदिरानगर, नाशिक) याने नरडाणा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि ठाकरे करीत आहेत.