Sunday, September 8, 2024
HomeनाशिकNashik Crime News : पंचवटीत दोन ते तीन जणांकडून अज्ञात व्यक्तीचा खून

Nashik Crime News : पंचवटीत दोन ते तीन जणांकडून अज्ञात व्यक्तीचा खून

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

येथील होळकर पुलाखालील (Under Holkar Bridge) पायरीजवळ शौचालय लगत एका फिरस्त्या व्यक्तीच्या डोक्यात अज्ञात मारेकऱ्यांनी किरकोळ कारणावरून शेजारील दगड घालून खून (Murder) केल्याची घटना रविवारी (दि. १०) सकाळी उघडकीस आली आहे…

- Advertisement -

या घटनेत मयत झालेला व्यक्ती ४० ते ४५ वयवर्षाचा असून हा फिरस्ता होता. त्याचा खून कोणी व कशासाठी केला? याचे कारण गुलदस्त्यात असून कदाचित खून झालेला व्यक्ती व संशयित आरोपी यांच्यात काहीतरी कारणावरून किंवा दारूच्या नशेत वाद झाला असावा आणि त्यातूनच ही घटना घडली असावी अशी शक्यता पोलिसांकडून (Police) वर्तविली जात आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी (दि.१०) रोजी सकाळी होळकर पुलाखाली असलेल्या पायरीजवळ एक अज्ञात व्यक्ती (Unknown Person) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याबाबत काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी जवळच असलेल्या मालेगाव स्टॅंड पोलिस चौकीत धाव घेत पोलिसांना माहिती कळविली. त्घयानंतर घटनेचे वृत्त कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, नंदन बगाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार दत्तात्रय शेळके आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ होळकर पुलाखाली धाव घेतली असता एक ४० ते ४५ वयोगटातील व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

दरम्यान, पहाटेच्या सुमाराला कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी (Unknown Killers) सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड किंवा पेव्हर ब्लॉक मारल्याने वर्मी घाव लागल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविलीआहे. तसेच ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून एकूण दोन ते तीन मारेकरी निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या