Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमCrime : चेष्टा मस्करीत झालेल्या वादातून एकाची हत्या

Crime : चेष्टा मस्करीत झालेल्या वादातून एकाची हत्या

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथे चेष्टा मस्करित झालेल्या दोन मित्रांच्या किरकोळ वादावादीत झालेल्या मारहाणीत एक मित्राचा मृत्यू झाला आहे. दिंडोरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत एक संशयितास अटक केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा – देशदूत ई-पेपर ८ डिसेंबर २०२४

रात्री नेहमीप्रमाणे दत्तू चंदर रेहरे व वसंत नामदेव गांगोडे हे मित्र गावातील पिंपळाच्या पारावर गप्पा मारत बसलेले असताना त्यांच्यात बोलाचाली होत वाद झाला. यात वसंतने धारदार सुतळी कापण्याच्या कटरने दत्तू यांचे मान, हनुवटी व छातीवर वार केले. यात दत्तू रेहरे (55) यांचा मृत्यू झाला.

हे देखील वाचाEknath Shinde : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले…

किरण दत्तू रेहरे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत वसंत गांगोडे यास अटक केली. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव अधिक तपास करत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...