Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्याधक्कादायक! पतीकडून पत्नीची हत्या

धक्कादायक! पतीकडून पत्नीची हत्या

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक शहरात खुनाचे सत्र काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही. किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा खून केल्याची घटना शहरात घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. पहिल्या पतीच्या नंदाईच्या घरून येण्यास उशीर झाल्याच्या कारणातून संतापलेल्या पतीने धारदार हत्याराने वार करून पत्नीची हत्या केली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिनेश शिवाजी पवार (वय 35, रा. ठाणे, मूळ रा. कवटा, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की संशयित आरोपी श्याम अशोक पवार (वय 32) व आरती श्याम पवार (वय 29) हे दोघे काही वर्षांपासून होलाराम कॉलनीतील कस्तुरबानगर येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र रहात होते. मयत आरती पवार ही तिच्या पहिल्या पतीच्या नंदाईकडे गेली होती. दरम्यान एक दिवसात परत येईल असे सांगून गेलेली आरती ही तीन दिवस उशिराने घरी परतली. त्यामुळे दोघांमध्ये खटके उडाले. त्यानंतर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्यात आला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दरम्यान, मयत आरतीला पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत. मोठ्या मुलीचे लग्न झाले असून, एक मुलगी 11 वर्षांची आहे. तर श्याम पवारपासून तिला एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आरती ही परिसरात धुणी भांडीची काम करीत असे. तर श्याम हा मोलमजुरीचे काम करतो. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त धुमाळ, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी श्याम पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या