Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजAssembly Elections 2024 : मविआत जागावाटपावरुन वादाची ठिणगी? नाना पटोले असल्यास बैठकीला...

Assembly Elections 2024 : मविआत जागावाटपावरुन वादाची ठिणगी? नाना पटोले असल्यास बैठकीला उपस्थित राहणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा

मुंबई | Mumbai
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खडाजंगी होत असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण, नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. आता ठाकरे गटाच्या या भूमिकेनंतर नाना पटोले काय बोलणार हे पाहावे लागेल.

महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील वाढीव जागांसाठी ठाकरे गट आग्रही असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भात जागा न सोडण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे. जागा वाटपाची चर्चा पुढे जात नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेविरोधात थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

विधानसभा निडणुकांच्या अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा, असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. मात्र, नाना पटोले यांची भूमिका जागावाटप पूर्ण करत असताना अडचण निर्माण करणारी आहे, असे म्हणत ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे हा विषय मांडला असल्याचे समजते आहे. दरम्यान आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातले काँग्रेस नेते सक्षम नाहीत, ते यादी दिल्लीला पाठवतात, त्यानंतर चर्चा होते. आता वेळ निघून गेली आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. तसेच आपले महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथल्ला आणि मुकूल वासनिक यांच्याशी बोलणे झाले आहे आणि राहुल गांधींशी आपण बोलणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. मुळे, आता पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या