Tuesday, October 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMahavikas Aghadi : हरियाणातल्या निवडणुक निकालांचे पडसाद महाराष्ट्रात; ठाकरे गटाचा एकला चलो...

Mahavikas Aghadi : हरियाणातल्या निवडणुक निकालांचे पडसाद महाराष्ट्रात; ठाकरे गटाचा एकला चलो रे… की काँग्रेस स्वबळावर?

मुंबई | Mumbai
हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटायला सुरूवात झाली आहे. सामनाच्या अग्रलेखामधून काँग्रेसला कानपिचक्या देण्यात आल्या आहेत. यावरून मविआत आता संघर्ष पेटायला सुरवात झाली आहे. त्यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता संजय राऊत बैठकीला आहेत, तर त्यांना बैठकीत विचारतो की त्यांनी अग्रलेख लिहिला हा मुद्दाम लिहिला की त्यांनी वस्तूस्थिती मांडली, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात मुख्यमंत्रि‍पदावरून ठाकरे गट आग्रही झाला आहे. हरयाणा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. हरियाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. इंडिया आघाडीचा विजय जम्मू काश्मीरमध्ये झाला. हरयाणात जर इंडिया आघाडी झाली असती, त्यात सपा, आप, एखादी जागा शिवसेना, राष्ट्रवादीला मिळाली असती तर त्याचा परिणाम निकालात झाला असता असे सांगत संजय राऊतांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.

- Advertisement -

काय म्हणाले नाना पटोले?
राऊतांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना नाना पटोलेंनी महाविकास आघाडीच्या बैठकीत आपण संजय राऊतांबरोबर काँग्रेसवरील टीकेसंदर्भात तसेच ‘सामना’मधील लेखासंदर्भात बोलणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. “आता संजय राऊत बैठकीला आहे तर बैठकीमध्ये त्यांना विचारतो की त्यांनी अग्रलेख लिहिला हा मुद्दामून लिहिला की त्यांनी वस्तुस्थिती मांडली. मात्र ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती नाही,” असे पटोले म्हणाले. “अशाप्रकारे अग्रलेखातून किंवा प्रतिक्रिया देऊन जाहीरपणे आघाडीमध्ये अशाप्रकारे बोलणे योग्य नाही,” असेही पटोले म्हणाले.

इतक्यावरच न थांबता काँग्रेसने स्वबळाची भूमिका असेल तर तसे जाहीर करावे या राऊतांच्या विधानावर नाना पटोलेंनी, “आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. कोणी मोठा भाऊ कोणी छोटा भाऊ नाही. आमच्यात काही वाद नाही. संजय राऊत यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. कुणाचा चेहरा द्यायचा हे बैठकीत आम्ही चर्चा करू,” असा विश्वास व्यक्त केला.

काय म्हणाले होते संजय राऊत?
आम्ही एकतर्फी जिंकू असं काँग्रेसला वाटत आहे, जिथे काँग्रेस कमकुवत असते तिथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते, हे भाजपाचेच धोरण आहे आणि जिथं काँग्रेसला वाटतं आपण मजबूत आहोत तिथे ते स्थानिक प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. या सगळ्याचा परिणाम हरयाणासारख्या निकालात झाला. हरयाणासारख्या राज्यात भाजपा विजयी होईल असं सांगणारा कुणी एकही व्यक्ती अथवा पत्रकार भेटला नाही. हरयाणातील पराभव दुर्दैवी असला तरी त्यातून आम्हाला काही गोष्टी शिकाव्या लागतील. देशातील निवडणुका आम्हाला एकत्रितच लढाव्या लागतील. कुणी स्वत:ला मोठा भाऊ, छोटा भाऊ समजू नये. लोकसभेतील यश इंडिया आघाडीचे आहे असं त्यांनी सांगत काँग्रेसला अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या