Saturday, July 27, 2024
Homeनाशिकमविप्र निवडणूक : आधी ढसाढसा रडले अन् आता प्रचारात झाले सहभागी

मविप्र निवडणूक : आधी ढसाढसा रडले अन् आता प्रचारात झाले सहभागी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मविप्र निवडणूक (MVP Election) आता चांगलीच रंगात आली असून प्रचारही शिगेला पोहोचलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार (Ravindra Pagar) यांना सभापतीपदाची उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांचे कार्यकर्ते ढसाढसा रडल्याचे वृत्त कसमादे परिसरात तेव्हा वाऱ्यासारखे पसरले होते. मात्र, आता पगार यांची नाराजी दूर झाल्याचे चित्र असून त्यांनी आपल्या याच कार्यकर्त्यांसह ते प्रचारात सहभाग घेत असल्याचे चित्र आहे…

- Advertisement -

निवडणूक काळात उमेदवारी देण्यावरून नाराजीचे नाट्य दोनही पॅनलमध्ये रंगले. रवींद्र पगार यांनी उमेदवारी मिळावी यासाठी परिवर्तनाच्या पॅनलच्या नेत्यांकडे आग्रह धरला होता.

लाचखोर चव्हाणकेला ‘इतक्या’ दिवसांची सीबीआय कोठडी

मात्र, प्रादेशिक समतोल राखताना पॅनल नेतृत्वाला पगार यांना संधी देता आली नाही. त्यामुळे काहीसे नाराज झालेले रवींद्र पगार (Ravindra Pagar) हे प्रचारापासून अलिप्त होते.

मविप्र निवडणूक : मतदान बुथमध्ये भ्रमणध्वनीचा वापर कराल तर याद राखा…

मात्र, अखेरच्या टप्प्यात म्हणजेच मतदानाच्या दोन दिवस अगोदर पगार यांनी परिवर्तनची साथ न सोडता परिवर्तन पॅनल बरोबरच प्रचारात कार्यकर्त्यांसह सक्रिय झाले आहेत. बागलाण सदस्य पदाचे उमेदवार डॉ. प्रसाद सोनवणे यांच्या समवेत त्यांनी प्रचार केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या