Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानाची मोडतोड - जयंत पाटील

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या विधानाची मोडतोड – जयंत पाटील

मुंबई –

मुख्यमंत्रिपदाबाबतच्या इच्छेबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चा सुरु आहेत. यावर जयंत पाटील यांनी

- Advertisement -

खुलासा केला आहे. मी दिलेली मुलाखत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वापरण्यात किंवा सांगण्यात आली आहे. त्यात मोडतोड करण्यात आली आहे असे पाटील यांनी म्हटले आहे. इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीतील माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती, असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, सांगलीतील इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत जयंत पाटील यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हावसं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. आमच्या पक्षाकडे अजून मुख्यमंत्रिपद आलेलंच नाही, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर मुलाखतकारानं पण तुमची इच्छा आहे का? असं जयंत पाटील यांना विचारलं. त्यावर पाटील म्हणाले, माझी इच्छा असणारच ना…प्रत्येक राजकारणार्‍याला मुख्यमंत्री व्हावसं वाटणारच. पण पक्ष जो निर्णय घेईल. शरद पवार जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो. त्यामुळे इच्छा सगळ्यांनाच असते. मला वाटतं की इतक्या दीर्घकाळ काम करणार्‍या प्रत्येकाला किंवा माझ्यापेक्षा मतदारांनाही इच्छा असू शकते. परंतु परिस्थिती, सध्याची संख्या पाहता आमचे 54 आमदार आहेत. त्यात मला वाटत नाही शक्य होईल. आमचा पक्ष वाढला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या