Thursday, September 19, 2024
Homeनाशिकनॅब महाराष्ट्राचे कार्य गौरवास्पद - राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

नॅब महाराष्ट्राचे कार्य गौरवास्पद – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नॅब महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण जे प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहे त्या कडे लक्ष देवून सोडविण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन राज्याचे राज्यपाल व नॅब महाराष्ट्राचे प्रमुख आश्रयदाते सी.पी. राधाकृष्णन यांनी राजभवनात आयोजित अखिल भारतीय अंध ध्वजदिन संकलनाचा शुभारंभ करतांना दिले.

राजभवनात आयोजित छोटेखानी समारंभात नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी दृष्टिबाधित व बहुविकलांग मुलांनी केलेला पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले. तर खजिनदार विनोद जाजू यांनी नेपल पिन लावून सन्मान केला. मानद महासचिव गोपी मयूर यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी मंडळाची ओळख करून कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

नॅब महाराष्ट्राचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी ४० वर्षात केलेल्या नॅब च्या कार्याचा अहवाल व हाती घेण्यात आलेले प्रकल्पांची माहिती राज्यपालांना अवगत केली व त्यासंबंधीचे मागणी पत्र राज्यपालांना सादर केले. राज्यपालांनी अंध निधी संकलनाच्या फलकाचे उद्घाटन करून दानपेटीत काही निधी टाकून ह्या उपक्रमाचे उद्घाटन निधी संकलनाचा प्रारंभ केला. नॅब महाराष्ट्राचे कार्य स्पृहणीय असून, नव तंत्रज्ञानाची ओळख आपण दिव्यांगांच्या भविष्य काळाचा वेध घेवून करित असल्याचे विषद केले.

दिव्यांगांसाठीचे रंगमंच, दिव्यांगाना सक्षमपणे जीवनात उभे राहण्यासाठी स्पर्धा परीक्षा, एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी.चे प्रशिक्षण व निवासी वसतीगृह बांधकाम करीत आहांत, हे विशेष उल्लेखनीय बाब आहे. विद्यापीठ स्तरावरील प्रश्न स्वतंत्रपणे सादर करावे असे सांगून नेत्रदान व अवयवदान ही समाजाच्या दृष्टीने नव संजीवनी देण्यासाठी आवश्यकता आहे. त्या दृष्टीने नॅब महाराष्ट्राने जनजागृती निर्माण होईल असे प्रबोधनात्मक कार्य हाती घ्यावे. असे आवर्जून सांगितले.नॅब महाराष्ट्राच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली व संस्था भेटीत नाशिकला येण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.

यावेळी उद्योजक भावेश भाटिया यांनी नॅब महाराष्ट्र नाव असलेली मोठी आकर्षक मेणबत्ती भेट देवून सन्मानित केले. हया कार्यक्रमासाठी सहसचिव डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सहखजिनदार रघुवीर अधिकारी, सहसचिव मंगला कलंत्री, उपाध्यक्ष शाहीन शेख, उपाध्यक्ष डॉ. भावेश भाटिया, सदस्य स्नेहल देव, जिल्हा विकास अधिकारी रत्नाकर गायकवाड, कार्यकारी अधिकारी विनोद जाधव, सतीश पठारे (सांगली) कुणाल भाटिया (सातारा) आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या