डॉ. सुजय विखे, नीलेश लंके, सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वाकचौरे, उत्कर्षा रूपवते यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि.13) मतदान झाले. यात सायंकाळी उशीरापर्यंत काही तालुक्यांतील मतदान केंद्रांवर मतदान सुरू राहिल्याने मतदानाची सरासरी, त्यानंतर मंगळवारी सकाळी अंतरिम आणि मंगळवारी रात्री अंतिम आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केली. यात नगर लोकसभेसाठी 66.61 टक्के मतदान झाले असून यात सर्वाधिक मतदान हे पारनेर विधानसभा मतदारसंघात 70.13 आणि सर्वात कमी मतदान अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात 62.50 झालेले आहे.
दरम्यान, मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीत गत पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा नगर लोकसभेसाठी 1.2 टक्के मतदान कमी झाले असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, त्यानंतर रात्री देण्यात आलेल्या आकडेवारीत नगर लोकसभेसाठी 66. 61 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. या मतदारसंघात 19 लाख 81 हजार 866 मतदार असून यापैकी 13 लाख 20 हजार 168 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ही 66.61 टक्के असल्याचे सांगण्यात आले. यात सर्वाधिक मतदान पारनेर विधानसभा मतदारसंघात 70. 13 टक्के झाले असून सर्वात कमी मतदान नगर शहरात 62.50 टक्के झाले आहे. यंदा मागील पंचवार्षिकच्या तुलनेत 1 लाख 50 हजार 329 मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मागील पंचवार्षिकला मतदारसंघात 64.79 टक्के मतदान झाले होते. यंदा अंतिम आकडेवारीत मतदारसंघातील 7 लाख 21 हजार 327 मतदारांनी तर 5 लाख 98 हजार 790 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
शेवगाव 2 लाख 27 हजार 666 (63. 3 टक्के), राहुरी 2 लाख 18 हजार 235 ( 70 टक्के), पारनेर 2 लाख 39 हजार 124 ( 70 . 33 टक्के), नगर शहर 1 लाख 88 हजार 795 (62 . 50 टक्के), श्रीगोंदा 2 लाख 23 हजार 352 (67. 90 टक्के) आणि कर्जत-जामखेड 2 लाख 22 हजार 996 ( टक्के 66 . 19 टक्के) आणि एकूण मतदान 12 लाख 63 हजार 781 झालेले असून टक्केवारी 63.77 टक्के आहे.
मतदानात 2 टक्क्यांनी वाढ
नगर लोकसभा मतदारसंघात यंदा मतदान टक्केवारीत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील पंचवार्षिकला या मतदारसंघात 64 . 79 टक्के मतदान झाले होते. यंदा मोठे प्रयत्न करून ही अवघी 2 टक्के वाढ झाली आहे.
संगमनेर, श्रीरामपुरात अधिक मतदान, अकोलेत सर्वात कमी
राहाता |प्रतिनिधी| Rahata
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि. 13 मे रोजी मतदान पार पडले. या मतदारसंघात 16 लाख 77 हजार 335 मतदारांपैकी 10 लाख 57 हजार 298 मतदारांनी बोटाला शाई लावून मतदानाचा हक्क बजावला. येथे सरासरी 63.03 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली. दरम्यान, सर्वाधिक मतदान संगमनेर विधानसभा मतदारसंघात 65.77 टक्के तर त्या खालोखाल श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 64.8 टक्के मतदान झाले. कमी मतदान अकोलेत 59.82 टक्के झाले. शिर्डीत 63.77, कोपरगाव 61.18, तर नेवाशात 63.29 टक्के मतदान झाले.
अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा या विधानसभा मतदार संघांचा मिळून तयार झालेला शिर्डी लोकसभा मतदार संघ विस्ताराने मोठा आहे. अकोले सारख्या दुर्गम भागाचा समावेश या मतदार संघात असल्यामुळे शांततेत मतदान पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मोठी मेहनत घ्यावी लागली. देशात सर्वत्र मतदानाचा टक्का घसरलेला असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी टिकवून ठेवण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश मिळाल्याचे दिसून येते.
मतदारसंघनिहाय झालेले मतदान
अकोले विधानसभा- एकूण मतदान 2 लाख 60 हजार 686 इतके असून त्यात पुरूष मतदार 1 लाख 36 हजार 898 तर स्त्री मतदार 1 लाख 23 हजार 787 इतके आहे.
तृतीयपंथीयांचे 1 मतदान आहे. पैकी 86 हजार 868 पुरूष मतदारांनी, 69 हजार 61 महिला मतदारांनी व 1 तृतीय पंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. एकुण 1 लाख 55 हजार 930 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 59.82 टक्के मतदान झाले.
संगमनेर विधानसभा- एकुण मतदान 2 लाख 79 हजार 791 इतके असून त्यात पुरूष मतदार 1 लाख 44 हजार 664 तर स्त्री मतदार 1 लाख 35 हजार 127 इतके आहे. पैकी 1 लाख 718 पुरूष मतदारांनी, 83 हजार 313 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. एकूण 1 लाख 84 हजार 31 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 65.77 टक्के मतदान झाले.
शिर्डी विधानसभा- एकुण मतदान 2 लाख 80 हजार 257 इतके असून त्यात पुरूष मतदार 1 लाख 44 हजार 250 तर स्त्री मतदार 1 लाख 36 हजार 1 इतके आहे. पैकी 96 हजार 531 पुरूष मतदारांनी, 82 हजार 183 महिला मतदारांनी व 2 तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बाजावला. एकुण 1 लाख 78 हजार 716 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 63.77 टक्के मतदान झाले.
कोपरगाव विधानसभा- एकुण मतदान 2 लाख 79 हजार 609 इतके असून त्यात पुरूष मतदार 1 लाख 42 हजार 148 तर स्त्री मतदार 1 लाख 37 हजार 455 इतके आहे. तृतीयपंथीयांचे 6 मतदान आहे. पैकी 93 हजार 474 पुरूष मतदारांनी, 77 हजार 584 महिला मतदारांनी व 1 तृतीय पंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 1 लाख 71 हजार59 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 61.18 टक्के मतदान झाले.
श्रीरामपूर विधानसभा- एकुण मतदान 3 लाख 79 हजार 609 इतके असून त्यात पुरूष मतदार 1 लाख 42 हजार 148 तर स्त्री मतदार 1 लाख 21 हजार 133 इतके आहे. तृतीयपंथीयांचे 60 मतदान आहे. पैकी 1 लाख 4 हजार 965 पुरूष मतदारांनी, 88 हजार 611 महिला मतदारांनी व 29 तृतीय पंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. एकून 1 लाख 93 हजार 605 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 64.08 टक्के मतदान झाले.
नेवासा विधानसभा- एकुण मतदान 2 लाख 74 हजार 859 इतके असून त्यात पुरूष मतदार 1 लाख 43 हजार 310 तर स्त्री मतदार 1 लाख 31 हजार 544 इतके आहे. तृतीयपंथीयांचे 5 मतदान आहे. पैकी 97 हजार 680 पुरूष मतदारांनी, 72 हजार 276 महिला मतदारांनी व 1 तृतीय पंथी मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावला. एकुण 1 लाख 73 हजार 957 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथे 63.29 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली असून 20 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच कोण बाजी मारणार हे स्पष्ट होईल.