Friday, May 16, 2025
Homeनगरनगर: शहरातील स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर पोलीसांचा छापा; एकाला अटक

नगर: शहरातील स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर पोलीसांचा छापा; एकाला अटक

अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील न्यू टिळकरोडवर असलेल्या स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. शहर पोलीसांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली. हुक्का पार्लरचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisement -

शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी न्यू टिळकरोडवर विनापरवाना स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास स्मोकी व्हिल्लावर छापा टाकला.

यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले. हुक्का पार्लरमधील साहित्य पोलीसांनी जप्त केले. किती साहित्य जप्त केले याची माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशकात तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati महायुती सरकारकडून राज्यभरात भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत असून, नाशिकमध्येही या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंचवटी...