Friday, May 3, 2024
Homeनगरबाजारपेठेतील अतिक्रमणे हटविली; मनपा अतिक्रमण विभागाकडून कारवाई

बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविली; मनपा अतिक्रमण विभागाकडून कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कापडबाजारातील हातगाडी व पथविक्रेत्यांची अतिक्रमणे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून हटविली. दिवाळीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे काही ठिकाणी अतिक्रमणधारकांनी विरोध दर्शवला. शहाजी रोड येथेही एका विक्रेत्याने बराच काळ अधिकार्‍यांना खडेबोल सुनावत कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनपाच्या पथकाने विरोध झुगारून कारवाई केली.

- Advertisement -

मनपाने कापडबाजार, मोचीगल्ली, गंजबाजार, घासगल्ली, शहाजी रोड, नवीपेठ आदी भागातील हातगाडी धारकांचे अतिक्रमण कायमस्वरूपी काढावे, अशी मागणी व्यापारी महासंघाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे केली होती. तसेच अतिक्रमणे न काढल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा व्यापार्‍यांनी दिला होता.

आयुक्त जावळे यांनी बाजारपेठेतील अतिक्रमणे काढण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी कापडबाजार, मोची गल्ली, शहाजी रोड येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. अतिक्रमण विरोधी पथकाने हातगाड्या तसेच अन्य साहित्य जप्त केले. या कारवाईमुळे बाजारपेठेतील रस्त्याने मोकळा श्वास घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या