राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी (Rahuri) शहरातील कै. बिहाणी विद्यामंदिर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची सहल (Student Trip) घेऊन जाणारी बस तालुक्यातील चिंचोली फाटा (Chincholi Phata) येथे नगर-मनमाड महामार्गावर पलटी झाली. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत काही विद्यार्थी किरकोळ जखमी (Student Injured) झाल्याचे समजते. याबाबत माहिती अशी कि, विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांची सहल गुजरात (Gujarat) राज्यात असलेल्या स्टॅचू ऑफ युनिटी (Statue of Unity) येथे जाण्यासाठी खाजगी बसने आयोजित करण्यात आली होती. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सदर बस ही राहुरी शहरातून नगर-मनमाड मार्गावरून (Nagar Manmad Highway) गुजरातकडे रवाना झाली. त्यानंतर ही बस चिंचोली फाटा येथे पोहचताच नगर-मनमाड महामार्गाच्या कडेला असलेल्या कपारीत या बसचे चाक गेल्याने ती अचानक पलटी (Travel Bus Accident) झाली.
बस पलटी झाल्याने बस मधील विद्यार्थी व शिक्षक पुर्णपणे घाबरून गेले होते. यावेळी एकच गोंधळ उडाला होता. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य करून विद्यार्थी व शिक्षकांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेत काही विद्यार्थी किरकोळ जखमी (Injured) झाल्याचे समजते. त्यांना राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातच पलटी झालेल्या या बसमध्ये भरलेली एक गॅसची टाकी आढळून आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळते. नगर-मनमाड महामार्गाचे (Nagar Manmad Highway) काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठया कपारी पडल्या आहे. या कपारीमुळे अनेक दुचाकीस्वार, चारचाकी वाहने यांचे अपघात झाले आहे.
या कपारीमुळे महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे बनले असून या कपारी तात्काळ बुजवाव्यात, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक असल्यानेही या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. यामुळे अनेक नोकरदार, विद्यार्थी व इतर प्रवाशांची गैरसोय होत आहे. काल झालेल्या सहलीच्या बसचा अपघात (Trip Bus Accident) अंगावर शहारे आणणारा होता. अपघात झाल्याची बातमी समजताच पालकांनी घटनास्थळी व रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.