डिग्रस |वार्ताहर| Digras
नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) अपघातांच्या घटना सुरुच असून काल दि. 24 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी विद्यापीठ (Rahuri University) परिसरात सिमेंट ब्लॉक घेऊन जाणारा आयशर टेम्पो रस्त्यावरील खड्ड्यामुळे चारचाकी गाडीवर पलटी (Tempo and Car Accident) झाला. या घटनेतील चारचाकी गाडीतील एक जण जागीच ठार (Death) झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
या घटनेतील मयत संभाजी सिताराम टोणे (वय 50) हे सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील रहिवाशी असून ते मनमाड येथील एफ सी आय या सेंट्रल गव्हरमेंट कंपनीत सेवेला होते. संभाजी टोणे, अजित सिंह कर्चे व चालक संदीप नरळे हे तिघेजण आज दि. 24 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 2 वाजे दरम्यान क्रेटा गाडी क्रमांक एम एच 10 इ ए 9131 या गाडीमध्ये बसून कोपरगावकडून अहिल्यानगरकडे जात होते. त्याचवेळी सिमेंट ब्लॉक घेऊन एक आयशर टेम्पो नगरकडून राहुरीकडे (Rahuri) येत होता.
विद्यापीठ परिसरात असलेल्या वळू प्रकल्पा जवळ एकेरी वाहतूक असलेल्या ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यामुळे सिमेंट ब्लॉकने भरलेला आयशर टेम्पो चारचाकी गाडीवर पलटी झाला. यावेळी क्रेटा गाडीत मागच्या सीटवर बसलेले संभाजी सिताराम टोणे हे जागीच ठार (Death) झाले. तर पुढच्या सीटवर बसलेले अजित सिंह कर्चे (वय 35 रा. पाचेगाव ता. सांगोला जि. सोलापूर) तसेच चालक संदीप सिताराम नरळे (वय 28 रा. कवठे महांकाळ जि. सांगली) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत चारचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, श्री. साखरे, पोलीस नाईक गणेश सानप तसेच तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब अपघातस्थळी धाव घेऊन महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली. तसेच जखमींना राहुरी (Rahuri) येथील एका रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय आधिकार्यांनी संभाजी सिताराम टोणे यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. तर जखमी झालेले अजितसिंह कर्चे व चालक संदीप नरळे यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेचा पुढिल तपास पोलिस नाईक गणेश सानप हे करीत आहे.




