Saturday, July 27, 2024
Homeनगरनगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू

राहाता |प्रतिनिधी| Rahata

दै. सार्वमतच्या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने (Department of Public Works) राहाता (Rahata) शहरातील खड्डे मुरूम टाकून तात्पुरत्या स्वरूपात बुजवल्याने वाहनधारकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून सततची वाहतूक कोंडीही कमी झाली आहे.

- Advertisement -

थोड्याशा पावसाने नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad Highway) खड्ड्यांचे (Pits) साम्राज्य पसरले असून सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडी संदर्भात दैनिक सार्वमतने खड्ड्यांकडे लक्ष वेधले होते. नगर-मनमाड महामार्गाची खड्ड्यांमुळे (Nagar-Manmad Highway Pits)अक्षरश: चाळण झाली होती. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत मात्र महामार्गाचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने आज तात्पुरत्या स्वरूपात बांधकाम विभागाने (Department of Public Works) मुरूमाने खड्डे बुजवले आहेत. मात्र रस्त्याचे तात्पुरती मलमपट्टी केल्याने प्रश्न सुटणार नाही.

कोपरगाव (Kopargav), शिर्डी (Shirdi), राहाता (Rahata), बाभळेश्वर (Babhaleshwar) ते कोल्हार (Kolhar) या चाळीस किलोमीटर अंतरातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे हा नित्याचा विषय झाला आहे. अनेकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. आंदोलने करूनही त्याची दखल घेतली जात नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Dr. Sujay Vikhe Patil) यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Union Road Transport Minister Nitin Gadkari) यांचेकडे पाठपुरावा केला. परंतु प्रत्यक्ष कामाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. हा महामार्ग सध्या राज्य सरकारकडे असल्याने रस्त्याच्या कामाची जबाबदारी राज्य सरकारची आहे त्याचे भिजत घोंगडे कधी दूर होणार हा खरा प्रश्न आहे.

वाहतुकीसाठी उत्तम दर्जा असलेला रस्ता बनवणे हे राज्य सरकारचे काम आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर-मनमाड महामार्गाच्या कामासाठी परिश्रम घेतले असून केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी 490 कोटी रुपये मंजूर केले आहेत. रस्त्याची सध्याची दुरवस्था ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. रस्ते अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे.

– आ. राधाकृष्ण विखे पाटील.

- Advertisment -

ताज्या बातम्या