राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गवर (Nagar Manmad Highway) राहुरी कॉलेज जवळ (Rahuri) असलेल्या साई टायर या टायरच्या शोरूमला (Tyre Showroom Fire) आज गुरूवार दि. 15 मे रोजी पहाटेच्या सुमारास विजेचे शॉटसर्केट होऊन आग लागली. यावेळी शोरुममधील लाखों रुपयांचा माल जळून खाक झाला आहे.
गुरूवार दि. 15 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास साहेबराव गाडे यांच्या साई टायर या टायरच्या शोरूममधून (Tyre Showroom) धूर निघत असल्याचे शेजारी राहणार्या एका तरुणाने पाहिले. त्याने ताबडतोब शोरूमचे मालक गाडे यांना माहिती दिली. शोरूममध्ये सर्वच चार चाकी वाहनांचे टायर असल्याने आगीने मोठा भडका घेतला होता. घटनेची माहिती मिळताच राहुरी, देवळाली प्रवरा व श्रीरामपूर येथील अग्निशमन दलाने (Fire Brigade) घटनास्थळी हजर राहुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
सदर आग शॉट सर्किट झाल्यामुळे लागल्याचे चर्चा परिसरात सुरु आहे. या आगीमध्ये शोरूम मध्ये असलेली दोन नवे ट्रॅक्टरचे टायर सह चार चाकी वाहनांचे नवे व जुने टायर, वाहनांचे स्पेअर पार्ट, फर्निचर आदींचे मोठे नुकसान होऊन मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी टॅक्टरच्या साह्याने शोरूमचे शटर तोडून ही आग विझवली. ही आग विझवण्यासाठी राहुरी नगरपरिषद अग्निशामक विभागाचे राजेंद्र पवार, विलास गडाख, बाळासाहेब पवार, नंदू मोरे तर देवळाली प्रवर नगरपरिषदेचे भारत साळुंखे, सखाहारी सरोदे, सुनील ताठे तसेच श्रीरामपूर नगरपरिषद (Shrirampur Municipal Council) अग्निशमन दलाचे संतोष रासकर, रोहित जाधव, लखन दाभाडे यांनी मोठे परिश्रम घेतले.