सिन्नर | वार्ताहर | Sinnar
येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान (Voting) प्रक्रियेदरम्यान आज (दि. 20) सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास शहरातील ब. ना. सारडा विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा (Fake Voter) प्रयत्न वेळेत हाणून पाडण्यात आला.
मतदान (Voting) प्रतिनिधींनी सतर्कता दाखवत कृष्णा सुनील निचळ (वय २५, रा. विजयनगर, सिन्नर) या इसमास दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे आधारकार्ड वापरून मतदान करताना रंगेहाथ पकडले. त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतरही कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत व सुरळीत सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेची पवित्रता जपण्यासाठी सिन्नर पोलीस ठाणे आणि निवडणूक यंत्रणेने तत्पर कारवाई केली.




