Sunday, April 27, 2025
Homeनगरमालवाहू वाहनाची मोटारसायकलला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

मालवाहू वाहनाची मोटारसायकलला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

भानसहिवरा |वार्ताहर| Bhanshiware

नेवासा (Newasa) तालुक्यातील उस्थळदुमाला शिवारात नगर-संभाजीनगर राज्य महामार्गावर (Nagar-Sambhajinagar Highway) मालवाहू वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत भानसहिवरा येथील तरुणाचा मृत्यू (Youth Death) झाला तर त्याची पत्नी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, भानसहिवरा येथील कृष्णा संभाजी भणगे (वय 27) हे पत्नी सोनालीसह बर्‍हाणपूर येथे बहिणीला भेटण्यासाठी त्याच्या यामाहा मोटारसायकलवरुन ( एमएच. 17 ए.क्यू. 9533) पत्नीसह गेले होते. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ते भानसहिवरा (मारुती तळे) येथे घरी परतत असताना उस्थळ फाट्याजवळ टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाने (एमएच 20 सीजी 2765) त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत (Hit) कृष्णा संभाजी भणगे यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे डोक्यातून रक्तस्राव सुरू होवून जागीच ठार (Death) झाले. पत्नी सोनाली कृष्णा भणगे गंभीर जखमी (Injured) झाल्या.

- Advertisement -

मयत कृष्णा भणगे हे नेवासा (Newasa) येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरीस होते. अपघातानंतर मालवाहू वाहनाचा चालक पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी जवळच असलेल्या एस्सार पेट्रोल पांपाजवळ पकडले. तर कृष्णा भणगे यांना रुग्णवाहिकेतून नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

मयत कृष्णा भणगे यांच्या पश्चात आई-वडील, चुलते, भाऊ, भावजाई असे 15 ते 20 जणांचे एकत्रित शेतकरी कुटुंब आहे. पत्नी सोनाली भणगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) मयताचे चुलतभाऊ किशोर श्रीपती भणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास नेवासा पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...