Wednesday, February 4, 2026
Homeनगरनगर-दौंड मार्गावर वाहतुकीत बदल

नगर-दौंड मार्गावर वाहतुकीत बदल

11 तारखेपर्यंत पर्यायी मार्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर ते दौंड जाणारे रस्त्यावर (Nagar To Daund Highway) नगर- बीड रेल्वे लाईनला (Nagar-Beed Railway Line) ओलांडणी पुलाचे बांधकामाचा तिसरा टाप्पा सुरु होत आहे. या बांधकामासाठी साईटजवळ मोठे गर्डर बसविण्यात आलेले आहेत. हे गर्डर बसविण्यासाठी मोठे क्रेन व ट्रेलर वापरण्यात येणार आहेत. हा रस्ता रहदारीचा असल्याने नगर ते दौंड या मार्गावरील कायनेटीक चौक ते अरणगाव बायपास रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले असून यात आज सकाळी 8 ते 11 तारखेला रात्रीपर्यंत दौंड या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. यात कायनेटीक चौकातून दौंड रोडने अरणगाव बायपासकडे जाणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग कायनेटीक चौक (Kinetic Chowk), केडगाव, केडगाव बायपास, अरणगाव बायपास मार्गे वळवण्यात आली आहे. अरणगाव चौकातून कायनेटीक चौकाकडे येणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग अरणगाव बायपास केडगाव बायपास केडगाव, कायनेटीक चौक, तसेच पुणेकडून दौंड रोडला जाण्यासाठी कायनेटीक चौकात येणारे वाहनांसाठी पर्यायी मार्ग केडगाव बायपास अरणगाव बायपासने वळवण्यात आली आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Nashik Crime : मॉलमधून मोबाईल चोरणारा चोरटा अटकेत

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik पाथर्डी फाटा (Pathardi Phata) येथील मॉलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ ने मुसक्या आवळून...