Saturday, April 19, 2025
HomeनगरNagar Urban Bank : ‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांची उद्या नगरला बैठक; ठेवी व...

Nagar Urban Bank : ‘नगर अर्बन’च्या ठेवीदारांची उद्या नगरला बैठक; ठेवी व कायदेशीर कारवाईवर होणार चर्चा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

नगर अर्बन बँकेत पाच लाखापुढे ठेवी असलेल्या ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यास होत असलेला विलंब तसेच नगर अर्बन बँक डबघाईस आणणारे संचालक मंडळ व थकबाकीदार कर्जदार यांच्यावर कायदेशीर कारवाईला असलेली संथ गतीच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या (रविवार, 20 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता अहिल्यानगर शहरातील महाजनगल्लीतील गायत्री मंदिर सभागृहात नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांची बैठक होणार आहे.

- Advertisement -

नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे सचिव डी. एम. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेत पाच लाखापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत कधी मिळणार, यांची आशा लागली आहे. तसेच बँकेला अडचणीत आणणार्‍या संशयित आरोपींना कठोर शासन होण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडूनही गांभीर्याने हालचाली होत नसल्याचे ठेवीदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ठेवीदार व खातेदारांसह सभासदांची बैठक रविवारी सकाळी होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

दरम्यान, यानंतर ठेवीदारांची कोणतीही बैठक घेतली जाणार नाही व व्हॉटसअ‍ॅपवर ठेवीदारांकडून दिल्या जाणार्‍या सूचनांचीही दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे रविवारच्या बैठकीस ठेवीदारांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ एप्रिल २०२५ – आयुष्य संपवणे हा उपाय नव्हे

0
विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देणार्‍या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या अहवालातदेखील तसे निरीक्षण नमूद आहे. मुलांवर त्यांच्या पालकांचे...