Saturday, November 23, 2024
Homeनगरनगर अर्बनला वनटाईम सेटलमेंटची परवानगी

नगर अर्बनला वनटाईम सेटलमेंटची परवानगी

चोपडा यांची माहिती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेला वन टाईम सेटलमेंट योजना राबविण्यास केंद्रीय निबंधक कार्यालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली. जास्तीत जास्त कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना चोपडा म्हणाले, नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या थकबाकीदार, कर्जदारांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय सहकार निबंधक विभागाने परवानगी दिली आहे. यासाठी माझ्यासह बँक बचाव समितीने यासाठी पाठपुरावा केला होता.

- Advertisement -

आता कर्ज थकबाकी असलेल्यांना या योजनेमुळे संभाव्य कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे. तसेच थकबाकी जमा झाल्याने बँकेलाही ठेवीदारांच्या ठेवी परत देणे सुलभ होईल. जास्तीत जास्त कर्जदारांनी या योजनेतून कर्ज परतफेड करावी, असे आवाहन रचोपडा यांनी केले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची कोट्यवधींची थकबाकी, तत्कालीन काही संचालक व काही अधिकार्यांनी केलेला गैरकारभार यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. सध्या बँकेवर अवसायक नियुक्त आहेत.

कर्ज वसुलीला वेग मिळावा यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालयाकडे वन टाईम सेटलमेंट योजनेची मागणी केली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कर्जदारांनी बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून कर्ज थकबाकी जमा करावी. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर कारवाई टळू शकते. तसेच सर्वसामान्य ठेवीदारांनाही त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे, असेही चोपडा यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या