Tuesday, March 25, 2025
Homeनगरअर्बन बँक घोटाळ्यात ममदापूरचा कर्जदार अटकेत

अर्बन बँक घोटाळ्यात ममदापूरचा कर्जदार अटकेत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या सुमारे 291 कोटींच्या कर्ज घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला काल, बुधवारी सायंकाळी ताब्यात घेत अटक केली आहे. रवींद्र जेजुरकर (रा. ममदापूर, ता. राहाता) असे त्याचे नाव आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक गणेश उगले यांनी ही माहिती दिली. बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणांमध्ये यापूर्वी अनेक संचालक व कर्जदारांना अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी खराडी बायपास (पुणे) येथून रवींद्र कासार या कर्जदाराला अटक केली होती. बुधवारी रवींद्र जेजुरकर याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला कर्ज मंजूर करताना अनियमितता झाली असल्याचे समोर आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्षांसह संचालक, कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. कर्ज बुडविल्यामुळे बँक अडचणीत आली असून ठेवीदारांच्या ठेवीही अडकल्या आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...