Tuesday, May 7, 2024
Homeनगरशिर्डीतील सर्व प्रभागात ओपन जीम सुरु करणार - नगराध्यक्षा कोते

शिर्डीतील सर्व प्रभागात ओपन जीम सुरु करणार – नगराध्यक्षा कोते

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

रोगप्रतिकार शक्ती वाढावी तसेच निरोगी आरोग्य रहावे यासाठी शिर्डीतील सर्व प्रभागात माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या

- Advertisement -

मार्गदर्शनाख़ाली ओपन जीम सुरु करणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी दिली.

नगराध्यक्षा अर्चनाताई कोते यांनी सांगितले की, आजच्या युगात व्यायामाचा अभाव असल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. गतिमान जीवनशैलीमुळे माणसाच्या आहारात असंतुलन तसेच शरीरास आराम व व्यायाम मिळत नसल्याने आयुष्यमान दिवसेंदिवस कमी होत आहे.

भावी पिढी सदृढ व निरोगी रहावे, त्यांना व्यायामासाठी साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी शिर्डीत सर्व प्रभागात ओपन जीम उभारण्याची माझी अनेक दिवसापासूनची संकल्पना होती. त्यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

यासाठी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन तसेच सर्व नगरसेवकांनी सहमती दर्शविल्याने आता लवकरच सर्व वार्डात ओपन जीमची उभारणी करुन त्या तातडीने सुरु केल्या जाणार आहे. यामुळे आता त्या त्या भागातील नागरिक, तरुणाई तसेच युवक व मुलांना आता व्यायाम करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अनेक सामान्य कुटुंबातील मुलांना व्यायामासाठी साहित्य व जागा उपलब्ध नसल्याने ते या पासूनवंचित होते. आता या जीमचा सर्वांना लाभ घेता येणार असल्याने भावी पिढी निरोगी, सदृढ राहण्यास मदत होणार आहे. वृध्द व्यक्तींसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा प्रयत्न असून यासाठी प्रयत्न चालू असल्याचे नगराध्यक्षा कोते यांनी म्हटले आहे.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील तसेच प्रत्येक प्रभागातील रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन आदी मुलभुत सर्व सुविधांची कामे दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात आली आहे.

साथीचे रोग पसरु नये, करोना जंतु संसर्ग होणार नाही, नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी सर्व प्रभागाची स्वच्छता, डास प्रतिबंधक फवारणी, फॉगींग मशिनद्वारे नियमीत धुर फवारणी केली जात आहे.

रस्त्यांची स्वच्छता चांगल्या पध्दतीने केली जात असून घऱोघरी दररोज घंटागाडीद्वारे कचरा संकलित केला जात आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांच्या घऱी जाऊन ऑक्सीमीटर तसेच थर्मामीटरच्या सहाय्याने दोनदा तपासणी मोहीम राबवून शहरातील सुमारे चाळीस हजार नागरिकांची तपासणी केली.

शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी शहरातील, उपनगरातील, रिंगरोडवरील दुभाजकात झाडे लावून त्यांची वेळेवर देखभाल केली जात आहे. याशिवाय सेल्फी पाईंट उभारण्यात आले आहे. शहराच्या विकास कामांसाठी गटनेते, उपनगराध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे नगराध्यक्षा कोते यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या