सिन्नर | प्रतिनिधी | sinnar
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी दि.२ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदाच्या ११ जागांसाठी एकूण ५३ तर नगरसेवकपदाच्या २६४ जागांसाठी एक हजाराहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात एकूण ६५.९४ टक्के मतदान झाले होते. यात सिन्नरमध्ये ६७ टक्के मतदान झाले होते. यानंतर आज (रविवार) सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली होती. यामध्ये आता पहिला कल हाती आला आहे.
त्यामध्ये पहिल्या फेरीत नगराध्यक्षपदासाठी शिवसेना उबाठाचे प्रमोद चोथवे आघाडीवर आहेत. तर प्रभाग तीन मध्ये राष्ट्रवादीचे शेखर गोळेसर आघाडीवर असून, शिवसेनेचे नितीन कराळे मतमोजणी केंद्राच्या बाहेर पडले आहेत. सध्या पहिली फेरी संपली असून, दुसरी फेरी सुरु झाली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रभाग पाचमध्ये नगराध्यक्षपदासाठी नामदेव लोंढे यांना २४५, प्रमोद चोथवे यांना १०६, हेमंत वाजे यांना १५६ आणि विठ्ठल उगले यांना १६२ तर किशोर देशमुख यांना चार मते मिळाली आहेत. तसेच प्रभाग आठमध्ये नगरसेवक पदासाठी संध्या श्याम कासार यांना 273 मते प्रियंका अतुल बोराडे यांना 180 मते जयश्री सुरज भगत यांना 157 मध्ये नोटाला सात मते पहिल्या फेरी अखेर मिळाली आहेत. याशिवाय प्रभाग आठ मध्ये नगरसेवक पदासाठी हर्षद देशमुखांना 352 शुभम येलमामे यांना 93 तर प्रशांत रायते यांना 168 मते पहिल्या फेरी अखेर मिळाली आहेत.
दरम्यान, पहिल्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे विठ्ठल उगले ११०० मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरी अखेर विठ्ठल उगले यांना 3853 मते, प्रमोद चोथे यांना 2755 मते, किशोर देशमुख यांना 78 मते, नामदेव लोंढे यांना 1866 तर हेमंत वाजे यांना १३८८ मते मिळाली आहेत. तसेच प्रभाग चार मध्ये हर्षद गोळेसर यांना 45 मते, देवानंद जाधव यांना 31, सागर भाडझिरे यांना 28, शुभम लोंढे यांना 275 तर संदीप लोंढे यांना 15 मते मिळाली आहेत.




