Friday, May 3, 2024
Homeनगरटेम्पोची दुचाकीला धडक; एक ठार

टेम्पोची दुचाकीला धडक; एक ठार

वैजापुर |प्रतिनिधी| Vaijapur

नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur Mumbai Highway) भगगाव शिवारात भरधाव टेम्पोेने दुचाकीला दिलेल्या धडकेत (Tempo Hit Bike One Death) एक जण ठार झाल्याची घटना आज (दि. 5) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. सुरेश कारभारी इंगळे (वय 58 रा. भगगाव) असे या घटनेतील मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

- Advertisement -

तलावात बुडून तीन भावंडांचा मृत्यू तर आईला वाचवण्यात यश

या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोपरगावकडून (Kopargav) वैजापूरकडे (Vaijapur) येणारा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एमएच 20 जीसी 0812 हा भगगाव (Bhagav) शिवारात आला असता इंगळे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच 03 एएल 8914 जोराची धडक दिली. या अपघातात (Accident) इंगळे गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

शिर्डीत नवीन इंटिग्रेटेड टर्मिनलसाठी 527 कोटी

मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे (Vaijapur Police Station) पोलिस निरीक्षक कौठाळे, ज्ञानेश्वर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहे.

श्रीरामपुरात तरुणाची हत्याज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण अवघ्या 3 मिनिटांत!

- Advertisment -

ताज्या बातम्या