Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याचिंचवड पोटनिवडणुकीत भाजपची 'काटें'शी टक्कर! जयंत पाटील यांची घोषणा

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपची ‘काटें’शी टक्कर! जयंत पाटील यांची घोषणा

पुणे | Pune

पुण्यात (Pune) पोटनिवडणुकीत (Bypoll Election) कसबा मतदार संघाचा (Kasba Bypoll) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) उमेदवार घोषित करण्यात आला होता. मात्र, पिंपरी-चिंचवड येथील उमेदवार घोषित करण्यात आला नव्हता.

- Advertisement -

या उमेदवारी बाबत कमालीचा सस्पेन्स बाळगण्यात आला होता. अखेर हा सस्पेन्स दूर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. नाना काटे (Nana kate) यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नाना काटे यांचं नाव उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. अजित पवार काही वेळात चिंचवडमध्ये दाखल होणार असून त्यांच्या उपस्थितीत नाना काटे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

पुण्यातील कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे, यात काहीच शंका नाही. पुणे पोटनिवडणुकीत भाजप (BJP) विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत दिसणार आहे.

दरम्यान, उमेदवारी घोषित झाल्यानंतर नाना काटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सहानुभूती व्यक्त केली आहे. मात्र, सहानुभूती आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.

अजित पवार यांनी ज्या प्रकारे चिंचवडचा विकास केला आहे. त्याच मुद्द्यावरून आम्ही या निवडणुकीला पुढे जाऊ, असे ते म्हणाले. तसेच या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार असून आमचाच विजय होईल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

- Advertisment -

ताज्या बातम्या