Sunday, November 24, 2024
HomeमनोरंजनFemina Miss India 2023 : नंदिनी गुप्ता ठरली २०२३ ची 'फेमिना मिस...

Femina Miss India 2023 : नंदिनी गुप्ता ठरली २०२३ ची ‘फेमिना मिस इंडिया’

मुंबई | Mumbai

५९ व्या फेमिना मिस इंडिया (Femina Miss India 2023) या स्पर्धेच्या विजेतीची शनिवारी (१५ एप्रिल) रोजी घोषणा करण्यात आली. त्यानंतर नंदिनी गुप्ता (Nandini Gupta) ही २०२३ची फेमिना मिस इंडिया ठरली आहे. अवघ्या १९ व्या वर्षी नंदिनीने हे विजेतेपद तिच्या नावावर केले आहे…

- Advertisement -

नंदिनी राजस्थान, कोटा येथील आहे. तिच्यासोबत, दिल्लीच्या श्रेया पुंजा (Shreya Punja) हिने फेमिना मिस इंडिया २०२३ पहिली रनर-अप आणि मणिपूरची थौनाओजम स्ट्रेला लुवांग दुसरी रनर-अप ठरली आहे. फेमिना मिस इंडिया २०२३ इम्फाळ, मणिपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

बळीराजाच्या स्वप्नांवर पुन्हा पाणी

नंदिनी गुप्ता ही राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी असून तेथूनच तिने बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच ‘फेमिना मिस इंडिया’ची विजेती बनण्याचे स्वप्न नंदिनी बघत होती. अखेर तिचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

दरम्यान, फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स २००२ आणि मेंटॉर नेहा धुपिया, दिग्दर्शक आणि लेखक हर्षवर्धन कुलकर्णी, बॉक्सिंग आयकॉन लैश्राम सरिता देवी, नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस, आणि प्रतिष्ठित डिझायनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशिपरा यांच्या एलिट पॅनेलद्वारे फेमिना मिस इंडियाच्या विजेत्यांची निवड करण्यात आली. तसेच या सोहाळ्याचे सूत्रसंचालन मनीष पॉल आणि भूमी पेडणेकर या जोडीने केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या