Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNandurbar Accident : अस्तंबा यात्रेहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; पिकअप गाडी उलटून...

Nandurbar Accident : अस्तंबा यात्रेहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; पिकअप गाडी उलटून सात ठार, आठ गंभीर जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी | Nandurbar

अस्तंभा ॠषिचे दर्शन करुन परत येणार्‍या भाविकांची पिकअप गाडी चांदशैली घाटातील खोल दरीत कोसळून
झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर आठ जण गंभीर आणि १० जण किरकोळ जखमी झाले आहे. मृतांमध्ये बहुतांश नंदुरबार तालुक्यातील (Nandurbar Taluka) भाविकांचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, दरवर्षी दीपावलीच्या पर्वावर धडगाव तालुक्यातील (Dhadgaon Taluka) असली येथे अस्तंबा (अश्‍वत्थामा) ॠषिची यात्रा भरत असते. यासाठी लाखो भाविक या ठिकाणी भेट देतात. दरम्यान काल वसुबारसच्या दिवशी नंदुरबार तालुक्यातील काही भाविक अस्तंभा (अश्‍वत्थामा) ॠषिच्या दर्शनासाठी गेले होते. आज तेथून परत येत असतांना दुपारी १२ वाजेच्या सुमारास चांदसैली घाटात या भाविकांची पिकअप गाडी खोल दरीत कोसळली.

YouTube video player

या अपघातात (Accident) सात जण जागीच ठार झाले. यातील पाच मयत नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील रहिवासी आहेत. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सुमारे १० जण किरकोळ जखमी झाले आहेत. या पिकअप गाडीमध्ये जवळपास २५ भाविक असल्याचे समजते.

दरम्यान, गंभीर जखमी भाविकांना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात (Nandurbar Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे. तर किरकोळ जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात (Taloda Police Station) गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरु – मंत्री...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केल्यानंतरही अनेक लाभार्थ्यांना हप्ता न मिळणे, ई केवायसी पूर्ण न...