Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारस्वॅब संकलन केंद्रांवरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

स्वॅब संकलन केंद्रांवरच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

नंदुरबार शहरात करोेना रूग्ण वाढत आहेत.त्यावर उपाययोजन म्हणुन शहरातील व्यावसायिक फेरीवाले भाजीपाला विक्रेत्यांची करोना चाचणी करण्यासाठी 10 पथकामार्फत स्वॅब घेण्याचे काम करण्यात येत आहे.

- Advertisement -

शहरातील हाटदरवाजा पोलीस चौकी, मंगळबाजार पोलीस चौकी, एसबीआय बँक चौक, शहर पोलीस स्टेशन जवळ, नेहरू चौक येथे स्थिर पथके नियुक्त करण्यात आली आहेत, तर सिंधी कॉलनी, गिरीविहार गेट ते कोरीट नाका, धुळे चौफुली ते बस स्टॅन्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर या भागात फिरत्या पथकामार्फत व्यावसायिकांची रॅपीड अन्टीजन चाचणी करण्यात येत आहे.

या ठिकाणी तपासणी साठी येणार्‍या नागरीकांमध्ये काही लक्षणे असणारे तर,काही कोरोना रूग्ण ही येत असतात,असे असतांना स्वॅब संकलन केंद्रांवर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतांना दिसत आहे.नागरीक येथे घोळक्यात उभे राहुन गर्दी करतांना दिसुन येतात.यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या