Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबारजिल्हयातील 340 ग्रामपंचायती करोनामुक्त

जिल्हयातील 340 ग्रामपंचायती करोनामुक्त

महेश पाटील, Nandurbar – नंदुरबार :

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात प्रशासन व ग्रामपातळीवर विविध उपाय योजना करण्यात आल्याने जिल्ह्यातील 595 पैकी 340 ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या आहेत. तर 142 ग्रामपंचायती करोनामुक्तीच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील 113 गावांनी कोरोनाला वेशीवरच अटकाव केल्याने एकही करोनाबाधीत आढळलेला नाही.

नंदुरबार जिल्ह्यात मागील तीन महिन्यात कोरोनाने कहर केला होता. कोरोनाचा दुसर्‍या लाटेत शहरी भागासह ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर शिरकाव केला होता. नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करोनामुक्त गावाचा संदेश देत करोनामुक्त झालेल्या गावांचे अभिनंदनही केले.

प्रशासनातर्फे विविध उपक्रम राबविल्यामुळे जिल्ह्यातील 595 पैकी 340 ग्रामपंचायतीत करोनामुक्त झाल्या आहेत तर 142 ग्रामपंचायती कोरोनामुक्तीचा मार्गावर येत्या 10 दिवसात त्यापैकी काही करोनामुक्त होतील. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे गाव पातळीवर प्रभावी अंमलबजावणी झाल्याने ग्रामपंचायती करोनामुक्त झाल्या. येत्या काळात लसीकरणासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे.

रघुनाथ गावडे ,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी,नंदुरबार

या उपक्रमाला चालना मिळावी. यासाठी ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ यांनी करोनामुक्त गांव अभियानाचे घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या करोनामुक्त गाव मोहिमेला मोठे बळ मिळणार आहे. या स्पर्धेतील विजेचा गावांना 50 लाखांचे 15 घसघसीत बक्षीसे देण्यात येणार आहेत.

यातच नंदुरबार जिल्ह्यात करोनाला रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तब्बल 340 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत.

जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात 582 ग्रामपंचायतींपैकी 482 ग्रामपंचायती मागील काळात कोरोनाबाधीत झाल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना शिरकाव केल्याने प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या.

त्यात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्यामार्फत आपले कुटूंबिय आपली जबाबदारी हा उपक्रम राबवत गावातील नागरीकांची तपासणी करण्यात आली.

त्यासोबत ज्या गावात करोनाबाधीत रूग्ण होते. त्या ग्रामपंचायतीने मास्क वाटप, सॅनिटाईझर वाटप, गावात फवारणी, स्वॅब तपासणी शिबीरे तसेच लसीकरण शिबीरे आदी उपाय योजनेच्या माध्यमातून गावाला कोरोनामुक्त केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात 595 ग्रामपंचायती आहेत. त्यातील 400 ग्रामपंचायती कोरोना बाधीत झाल्या होत्या. त्यापैकी प्रशासन व ग्राम पातळीवर विविध उपाय योजनेमुळे 340 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या. तर सध्या घडीला जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायतीत 250 कोरोना बाधीत रूग्ण आहे तर आतापर्यंत जिल्ह्यातील 113 गावांनी कोरोना वेशीवर अटकाव केल्याने 113 गावांत एकही कोरोना बाधीत आढळला नाही. नंदुरबार जिल्ह्यात प्रशासन व ग्रामपातळीवर प्रभावी उपाय योजना झाल्याने 340 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यात प्रशासनाने राबविलेल्या गाव तेथे विलगीकरण कक्ष गाव पातळीवर राबविण्यात आले ते प्रभावी ठरले. नुकताच ग्रामविकास विभागाने कोरोनामुक्त गांव स्पर्धा जाहिर केल्याने कोरोना बाधीत गावांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायतही कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या