Wednesday, May 22, 2024
Homeधुळेनंदुरबार : मयत महिलेला जिवंत असल्याचे भासवून दिला बनावट अंगठा; पोलीसात गुन्हा...

नंदुरबार : मयत महिलेला जिवंत असल्याचे भासवून दिला बनावट अंगठा; पोलीसात गुन्हा दाखल

नंदुरबार| प्रतिनिधी

शहादा येथील दिवाणी न्यायालयात आर्थिक फायद्यासाठी मयत असलेल्या महिला जिवंत असल्याचे भासवून बनावट अंगठा दिल्याप्रकरणी चौघांविरूध्द तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाणी न्यायालय व स्तर शहादा येथे फत्तेसिंग पाडवी, जहांगीबाई पाडवी, बारकीबाई पाडवी यांनी संगनमत करून सुमनबाई गुलाबसिंग पाडवी या मयत असल्याचे त्यांना माहित असून देखील न्यायालयाची व शासनाची फसवणूक करण्याचा व गैरप्रकाराने आर्थिक फायदा मिळविण्याच्या इरादा खोटा व बनावट निशाणी अंगठा केला व मयत व्यक्तीस जिवंत असल्याचे भासवून फसवणुकीचे कृत्य केले.

न्यायालयाच्या निर्देशावरून उपविभागीय कार्यालयाचे कारकून राजु महारू गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात फत्तेसिंग दित्या पाडवी, अनिल दित्या पाडवी, जहांगीबाई हाकल्या पाडवी, बारकीबाई दित्या पाडवी सर्व रा.सेंधवान ता.अक्कलकुवा यांच्याविरूध्द भादंवि कलम ४२०, ४१९, ४१७, ४६५, ४६८, ४७१,१९३, १९९, २००, २०५, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास प्रशांत राठोड करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या