Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारसाडेबारा लाखांत फसवणूक

साडेबारा लाखांत फसवणूक

अडीच हजार महिलांना गृह उद्योगातून आर्थिक लाभाचे आमिष

नंदुरबार

नंदुरबार येथे गृह उद्योगातून आर्थिक लाभाचे आमिष दाखवत 2 हजार 583 महिलांची साडेबारा लाखात फसवणूक केल्याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात जळगांव येथील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पालीस सुत्रांनी दिलेेल्या माहितीनुसार, जळगांव येथील प्रज्ञा संजिवनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैशाली श्यामकुमार सोलंकी, सचिव भानुदास शिवाजी पवार या दोघांनी प्रज्ञा संजिवनी फाऊंडेशनच्या माध्यमातून गृहउद्योग देवून त्यातून आर्थिक लाभाचे आमिष दाखवून 2 हजार 583 महिला सभासद करून फी व डिपॉझिट म्हणून 12 लाख 50 हजार रूपये घेतले. या साडेबारा लाखाची कुठलीही लेखी पावती किंवा सभासदांचे प्रमाणपत्र न देता गृहउद्योगाकरीता काही प्रमाणात मसाला, पॅकींगचे साहित्य पाठवून सभासद महिलांकडून मजूरीचे काम करून घेतले.

तयार झालेला माल देवून मजूरीची तसेच फी व डिपॉझिट परत न करता साडेबारा लाखात महिलांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पल्लवी राजेंद्र महाले रा.गणेश कॉलनी,नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात प्रज्ञा संजीवनी फाऊंडेशन अध्यक्ष वैशाली श्यामकुमार सोलंकी, भानुदास शिवाजी पवार दोन्ही रा.जळगांव यांच्याविरूध्द भादंवि कलम 406, 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि बाळासाहेब भापकर करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या