Saturday, November 23, 2024
Homeधुळेअवैध डांबर कारखाने उद्ध्वस्त

अवैध डांबर कारखाने उद्ध्वस्त

धुळे  – 

तालुक्यातील दिवाणमळा, अनकवाडीसह मुकटी परिसरात आज भल्या पहाटे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पथकासह छापा टाकून अवैध डांबर कारखाने उध्वस्त केले.

- Advertisement -

घटनास्थळाहुन दोन ट्रक, पांढर्‍या रंगाची पावडर, रिकामे ड्रम, एक टँकर, तीन मिक्सर मशीन असे लाखोंचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी 8 ते 10 जणांना संशयीतांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

या परिसरातून वरील साहित्याच्या माध्यमातून डांबर बनवून ते काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा पोलिसांना संशय आहे़ दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे वाल्यांचे धाब दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पहाटे धाडसत्र  राबवित धुळे तालुक्यातील दिवाणमळा, मुकटी, अनकवाडी गावाजवळील काळे डांबर बनविण्याचे कारखाने उध्वस्त केले़ दिवाणमळा परिसरात कारवाई करुन डांबर बनविण्याचे साहित्य, एक मिक्सर, मशीन जप्त करण्यात आले़ तर अनकवाडी गावाजवळील जंगलात एक टँकर, रिकामे ड्रम, दोन ट्रक पांढर्‍या रंगाची पावडर असे साहित्य जप्त करण्यात आले़ मुकटी परिसरातही डांबर बनविण्याचा कारखाना आढळून आला आहे़ .

या तिनही ठिकाणाहून डांबर बनविण्याचे साहित्य आढळून आले असून तो सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे़  तसेच 8 ते 10 जणांना संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे़

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या